1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (17:59 IST)

निष्काळजीपणा केल्याबद्दल 30 अधिकाऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा

suicide
उत्तर कोरियाचा हुकूमशहा कोणतीही चूक किंवा निष्काळजीपणा सहन करू शकत नाही. याचे ताजे उदाहरण समोर आले आहे.नुकत्याच उत्तर कोरियात विनाशकारी पूर आला होता या पुरात 4000 लोकांचा मृत्यू झाल्याने उत्तर कोरियाचा हुकूमशहा संतप्त झाला आणि पूर रोखण्यात अपयशी झाल्याने त्यांनी 30 अधिकाऱ्यांना तातडीनं फाशीची शिक्षा दिली. 

प्रलयकारी पुरांमुळे चांगांग प्रांतातील काही भाग उध्वस्त झाला ज्यात चार हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला. किम यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यावर पुराची तीव्रता पाहून ते चांगलेच संतापले आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर त्यांनी 30 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली. 

उत्तर कोरियाच्या सेंट्रल न्यूज एजन्सीने यापूर्वी जुलैमध्ये चगांग प्रांतात आलेल्या विनाशकारी पुरानंतर किम जोंग उन यांनी अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचे आदेश दिले होते. या पुरात जवळपास 4,000 लोकांचा जीव गेला आणि 15,000 हून अधिक लोक बेघर झाले.
Edited by - Priya Dixit