गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मॉस्को , मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (18:19 IST)

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे निकटवर्तीय कोरोना संक्रमित, स्वत: ला आइसोलेट केले

Russia President
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर, पुतीन यांनी खबरदारी म्हणून स्वत: ला आइसोलेट (Self-Isolate)  केले. क्रेमलिनने मंगळवारी सांगितले की पुतीन त्यामुळे प्रादेशिक सुरक्षा बैठकांसाठी या आठवड्यात ताजिकिस्तानला जाणार नाहीत.
 
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सीएनएनला ही माहिती दिली. क्रेमलिनने सांगितले की अलीकडेच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निकटवर्तीयांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. त्यानंतर पुतीन राष्ट्रपती भवनातच सेल्फ-आयसोलेशनमध्ये आहेत.