शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 4 मार्च 2017 (10:10 IST)

शिल्पाला गुगलच्या कॅफेटेरियात मिळाले 'सरप्राईज'

shilpa shetti
सध्या कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथे शिल्पा शेट्टी असून तिने यावेळी गुगल आणि फेसबुक मुख्यालयाला भेट दिली. शिल्पाला गुगुल कॅफेटेरियाकडून एक सरप्राईज मिळाले. तिच्या हिट गाण्यांचा स्पेशल मेनू शिल्पासाठी त्यांनी बनवला होता. भारतीय पद्धतीचे जेवण शिल्पाला आवडत असल्याने त्याची देखील खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे जेवणात तूप आण नारळाचा वापर करण्यात आला होता. शिल्पाने संपूर्ण गुगल मुख्यालयाला भेट दिली. गुगलचे मुख्यालय म्हणजे शिल्पाला एका शहरात आणखी एक शहर असल्यासारखे वाटले. तेथील कर्मचार्‍यांना ज्याप्रकारे सुविधा दिल्या जातात ते पाहून शिल्पा भारावली. तेथील कर्मचार्‍यांसाठी शिल्पाने योग क्लास घेतला. यात तिने त्यांना प्राणायम करण्यास शिकविले.