अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील गुरुद्वारामध्ये गोळीबार
अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो काउंटीमध्ये रविवारी रात्री उशिरा (स्थानिक वेळेनुसार) एका गुरुद्वारामध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार, येथे तीन लोकांमध्ये गोळीबार झाला, ज्यामध्ये दोन जणांना गोळ्या लागल्या. दोघांची प्रकृती गंभीर आहे. काउंटी शेरीफच्या कार्यालयाने सांगितले की गोळीबार तीन परिचितांमध्ये झाला. पोलिसांनी हे द्वेषमूलक गुन्ह्याचे प्रकरण मानले नाही. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
या गोळीबाराचा द्वेषाच्या गुन्ह्याशी संबंध नाही, कारण गोळीबारात सहभागी असलेले तिघेजण एकमेकांच्या ओळखीचे होते. रविवारी गुरुद्वारामध्ये नगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो लोक गुरुद्वारामध्ये जमा झाले. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गोळीबारात सहभागी असलेले तिघेजण एकमेकांच्या ओळखीचे होतेयापूर्वी काही कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर एका संशयिताने आपली बंदूक बाहेर काढली आणि भांडणात सहभागी असलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या मित्रावर गोळी झाडली. यानंतर गोळी न लागलेल्या व्यक्तीने बंदूक काढून पहिल्या शूटरवर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.
Edited By- Priya Dixit