बुधवार, 15 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 13 ऑक्टोबर 2025 (10:55 IST)

अमेरिकेतील बारमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, ४ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी

Shooting
अमेरिकेतील एका बारमध्ये रविवारी पहाटे गोळीबार झाला, त्यात ४ जणांचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले. अशी माहिती सामोरे आली आहे. अचानक झालेल्या गोळीबारामुळे घाबरलेले लोक आश्रयासाठी धावत होते.
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना शहरातील एका बारमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार झाला. या अंदाधुंद गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमींवर सध्या उपचार सुरू आहे. जखमींची संख्या सध्या २० इतकी आहे, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. तसेच ही घटना दक्षिण कॅरोलिना येथील सेंट हेलेना बेटावरील गर्दीच्या बारमध्ये घडली, जिथे मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की गोळीबारामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही, परंतु ते संशयितांचा शोध घेत आहे.  
Edited By- Dhanashri Naik