संबंधित माहिती
- IIT Bombay मध्ये रामायणाचा अपमान ! 8 विद्यार्थ्यांना 1.2 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात आला
- ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅंपसचे पीएम मोदींनी केले उदघाटन
- IIT Kanpur Viral Video: आयआयटी कानपूरमध्ये कबड्डीदरम्यान घडला 'दंगल'
- IIT मुंबईमध्ये 'शाकाहारी जागेवर' मांसाहार केल्याने विद्यार्थ्याला दहा हजारांचा दंड, काय आहे प्रकरण?
- वर्गात शिकत असताना नववीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
अमेरिकेच्या सिनसिनाटी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गोळीबार, तीन ठार
अमेरिकेतील सिनसिनाटी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सोमवारी सकाळी गोळीबार झाला. किमान पाच जणांना गोळ्या लागल्याची माहिती आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यात एक जखमी आहे.
सिनसिनाटी पोलिस विभागाच्या म्हणण्यानुसार, गोळीबाराच्या ठिकाणी अनेक बंदुका सापडल्या असून जखमी व्यक्तीसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
स्थानिक वृत्त स्टेशननुसार, परिसरात गस्त घालत असलेल्या काही पोलिस अधिकाऱ्यांनी कॅम्पसमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकला आणि त्यानंतर काही लोक जखमी झाल्याचे दिसले. यातील पाच जणांना गोळ्या लागल्या होत्या.
Edited by - Priya Dixit
