बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जानेवारी 2018 (17:07 IST)

अनुष्का शंकरचा घटस्फोट

सुप्रसिद्ध सितारवादक पंडित रवीशंकर यांची कन्या, भारतीय वंशाची ब्रिटीश सितारवादक अनुष्का शंकरचा घटस्फोट झाला आहे. सात वर्षांच्या संसारानंतर अनुष्का दिग्दर्शक पती जो राईटपासून विभक्त झाली. त्यांना जुबिन आणि मोहन ही दोन मुलं आहेत.

2009 मध्ये अनुष्का आणि जो यांची भेट दिल्लीत झाली होती. त्यानंतर  अनुष्का-जो जगभरात वेगवेगळ्या कॉन्सर्टच्या निमित्ताने भेटत राहिले होते. 26 सप्टेंबर 2010 रोजी लंडनमध्ये एका खाजगी सोहळ्यात दोघं विवाहबंधनात अडकले. अनुष्का शंकरला सहा वेळा ग्रॅमी पुरस्कारांचं नामांकन मिळालं आहे. जो राईट यांनी 'प्राईड अँड प्रेज्युडाईस', 'इंडियन समर' सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केल आहे.