बर्फात घर बनवून जिवंत राहिला बेपत्ता गिर्यारोहक
न्यूझीलंडच्या डोंगरांमध्ये आठवडाभर जीवन व मृत्यूची लढाई लढणार्या एका ऑस्ट्रेलियन गिर्यारोहकाला सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. बचावपथकाने सांगितले की, हा गिर्यारोहक लष्करी प्रशिक्षणामुळे स्वतःला जिवंत ठेवू शकला असावा. हा 29 वर्षीय गिर्यारोहक वनाकानजीकच्या एसपाइरिंग पर्वतावर गिर्यारोहणासाठी एकटाच गेला होता. तो सात दिवसांपासून गायब असल्याचे सांगितले जात होते. सुरक्षारक्षकांना त्याला सात दिवसांनंतर शोधून काढण्यात यश आले. बचावपथकाने सांगितले की, या गिर्यारोहकाला लष्करी प्रशिक्षणाचा फायदा झाला. तो हेलिकॉप्टरही उडवू शकतो. या डोंगरांवर ताशी 60 किलोमीटर वेगाने वाहणारे थंड वारे आणि प्रचंड हिमवर्षावात स्वतःला सात दिवस जिवंत ठेवण्यात तो यशस्वी ठरला. त्याने स्वतःच बर्फाचे एखादे घर बनविले असेल व त्यामुळेच तो जिवंत राहण्यास यशस्वी झाला. सुरक्षारक्षक या गिर्यारोहकाचा शोध घेत होते, तेव्हा तो चांगल्या अवस्थेत होता. त्याला काही किरकोळ जखमाझाल्या होत्या. ऑस्ट्रेलियन लष्कराने हा गिर्यारोहक लष्करात राहिला असून सध्या सुट्टीवर असल्याची पुष्टी केली आहे.