मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

व्हॉट्स एपवर अश्लील ग्रुप सात अटकेत, पोलीस करत आहेत चौकशी

व्हॉट्स एपवर अश्लील ग्रुप तयार करत अडल्ट, अश्लील चित्रफित देवाण घेवाण करत लहान मुलां मुलींसोबत शरिर सबंध कसे करायचे या विषयवार आधारित ग्रुप बीबी बॅड बॉइज वर ठाणे पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात ठाणे पोलिसांनी नाशिक मधून दोघांना अटक केली असून या प्रकरणात एकूण सात लोकांना अटक केली आहे.
 
लहान मुले मुली ज्यांची वय ९ ते १२ वर्ष आहेत या सोबत कसे शारिरीक सबंध ठेवायचे असे मेसेज बीबी बॅड बॉइज ग्रुप मध्ये सुरु होते. चित्रफिती आणि कायद्याने बंदी असलेले लहान मुलांचे अनेक व्हिडीयोज शेअर केले जात होते. याबाबत ची माहिती ठाणे पोलिसांना समजली होते. पोलिस अधिकारी प्रदीप सावंत यांनी असे ग्रुप शोधत त्यांच्यावर नजर ठेवली, ग्रुपमधील हालचाली, मेसेजेस आणि चित्रफित देवाण घेवाण यावरून सर्व माहिती एकत्र केली. या ग्रुपमध्ये लहान मुलांबद्दल व्हिडिओ आणि इतर साहित्य पहिले जात होते. यातील तरुण हे उच्चशिक्षित असून काही तर  नुकतेच पास झाले आहेत. 
 
या ग्रुपमध्ये लहान मुलांबद्दल आक्षेप घेण्याजोगे कायदेशीर गुन्हा असलेली माहिती शेअर केली जात होती, तर कोणत्याही लहान मुलांचे शारिरीक शोषण झाले आहे का ? या ग्रुपचा अजून काय उपयोग  होता? इतर कोणते ग्रुप जोडले आहे. यातील ग्रुप निर्माता आणि इतर २०० पेक्षा अधिक सदस्य यांची पोलिसांनी चौकशी सुरु केली असून ज्यांना अटक केली आहे त्यांना कोर्टाने कोठडी सुनावली आहे.