सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मे 2018 (09:15 IST)

पृथ्वीला सोलर स्टॉर्म धडकण्याची शक्यता

येत्या 48 तासात पृथ्वीला सोलर स्टॉर्म धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वैज्ञानिकांच्या मते, सूर्याला एक कोरोनल होल होईल ज्यामुळे सूर्यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर येईल. या दरम्यान ब्लॅकआउट सारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. या दरम्यान सर्व सिग्नल बंद होतील. उपग्रहाशी संबंधित सर्व सेवा जसे मोबईल, टीव्ही, जीपीएस सेवा देखील यामुळे बंद होऊ शकते. याशिवाय रेडिएशनचा धोका देखील वर्तवला जातो आहे.

स्पेस वेदरच्या रिपोर्टनुसार या घटनेदरम्यान 'सोलर डिस्कच्या जवळपास मध्यभागी एक होल होईल. ज्यामुळे सूर्याच्या वातावरणातून पृथ्वीकडे गरम हवेचं वादळ येईल. नासाकडून जारी करण्यात आलेल्य़ा फोटोमध्ये गॅसचं हे वादळ पाहिलं जाऊ शकतं. नॅशनल ओशन अँड अॅटमॉस्फियर असोसिएशनचं म्हणणं आहे की, हा सोलर स्टॉर्म जी-1 कॅटेगरीचा आहे. म्हणजे या वादळाची तीव्रता कमी असेल. पण यामुळे देखील मोठं नुकसान होऊ शकतं. माहितीनुसार जी-1 कॅटगरीमध्ये पावर ग्रिडवर सर्वाधिक प्रभाव पडेल. मायग्रेटरी बर्ड्सवर देखील याचा गंभीर परिणाम होईल. यूएस आणि यूकेमध्ये याचा सर्वाधिक प्रभाव पडण्याची शक्यता आहे.