स्पेस वेदरच्या रिपोर्टनुसार या घटनेदरम्यान 'सोलर डिस्कच्या जवळपास मध्यभागी एक होल होईल. ज्यामुळे सूर्याच्या वातावरणातून पृथ्वीकडे गरम हवेचं वादळ येईल. नासाकडून जारी करण्यात आलेल्य़ा फोटोमध्ये गॅसचं हे वादळ पाहिलं जाऊ शकतं. नॅशनल ओशन अँड अॅटमॉस्फियर असोसिएशनचं म्हणणं आहे की, हा सोलर स्टॉर्म जी-1 कॅटेगरीचा आहे. म्हणजे या वादळाची तीव्रता कमी असेल. पण यामुळे देखील मोठं नुकसान होऊ शकतं. माहितीनुसार जी-1 कॅटगरीमध्ये पावर ग्रिडवर सर्वाधिक प्रभाव पडेल. मायग्रेटरी बर्ड्सवर देखील याचा गंभीर परिणाम होईल. यूएस आणि यूकेमध्ये याचा सर्वाधिक प्रभाव पडण्याची शक्यता आहे.