मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (10:39 IST)

या महिलेने 10 मुलांना जन्म दिला

गोसीम थमारा सिथोल नावाच्या दक्षिण आफ्रिकेच्या 37 वर्षीय महिलेने एकाच वेळी 10 मुलांना जन्म दिल्याचा दावा केला आहे.  या महिलेने सात मुलगे व तीन मुलींना जन्म दिल्याचे अहवालात म्हटले आहे. जर महिलेचा दावा खरा असेल तर तो एक नवा विश्वविक्रम ठरू शकेल.
 
या महिलेचा पती टेबोगो त्सोतेत्सीच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीने प्रिटोरियाच्या रुग्णालयात 7  जून रोजी सिझेरियन सेक्शनद्वारे दहा मुलांना जन्म दिला. जर महिलेचा दावा खरा असेल तर तो एक नवा विश्वविक्रम ठरू शकेल. सध्या एका गर्भावस्थेतून जास्तीत जास्त मुलांना जन्म देण्याचा विक्रम मालीच्या हलीमा सिसे यांच्या नावावर आहे, ज्याने मे मध्ये मोरोक्कच्या रुग्णालयात नऊ मुलांना जन्म दिला.
 
सिथोल आधीपासूनच जुळ्या मुलांची आई आहे, त्यांनी सोमवारी ऑपरेशनद्वारे सात मुलं आणि तीन मुलींना जन्म दिला. महिलेला सुरुवातीला डॉक्टरांनी सांगिलत्याप्रमाणे सात मुलांची अपेक्षा होती. या अत्यंत दुर्मिळ गर्भधारणेस सामोरे जाण्यासाठी पुरेशी उपकरणे नसल्यामुळे मालिशियन डॉक्टरांनी सिस्से यांना सरकारी आदेशानुसार प्रसुतीसाठी मोरोक्कोला पाठविले. या महिलेवर कॅसाब्लांकाच्या खाजगी अ‍ॅन बोर्जा क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले आणि तेथेच महिलेने मुलांना जन्म दिल्याची पुष्टी केली गेली.
 
मेलऑनलाइनच्या रिपोर्टप्रमाणे सिथोलने दावा केला की त्यांचे सर्व मुलं नैसर्गिक रुपाने गर्भात आहे. परंतु गर्भावस्था सोपी नव्हती. कारण त्यांना अत्यंत पायदुखी आणि हार्टबर्नच्या समस्यांना सामोरा जावं लागलं.
 
अहवालानुसार सर्व दहा बाळं जिवंत आहेत आणि पुढील काही महिने इनक्यूबेटरमध्ये राहतील. सिथोल यांचे पती म्हणाले की आम्ही दोघेही डिलेव्हरीनंतर आनंदी आणि भावुक झालो आहोत.