बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (17:02 IST)

ट्रम्प कन्येकडून सुषमा स्वराज यांचे कौतुक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प हिने स्वराज यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. सुषमा स्वराज या प्रभावशाली परराष्ट्रमंत्री असल्याचे इंवाकाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.न्यूयॉर्क येथे सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या वार्षिक सत्रात इवांकाने स्वराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात बराच काळ चर्चा झाली. त्यानंतर इवांकाने ट्विटरवर लिहिताना म्हटले, “भारताच्या कुशल व प्रभावशाली परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा सन्मान करते. त्यांच्याशी भेट होणे ही सन्मानाची बाब आहे असे म्हटले आहे.