1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. suicide in mumbai

मुंबई : एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्‍न

suicide in mumbai

मुंबईतील नालासोपाऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांनी विष पिऊन आत्महत्या करण्‍याचा प्रयत्‍न केल्याची घटना घडली आहे. या घटनेत बाप-लेकीचा मृत्यू झाला असून आई आणि दुसरी मुलगी बचावल्या आहेत. त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.प्रगतीनगरमध्ये मनीष बहाद्दूरसिंग (३०) कुटुंबासह राहतो. मनिषवर बँकेचे कर्ज असल्यामुळे नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

 रविवारी रात्री मनिषसह संपूर्ण कुटुंबाने विष पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मनिषसह प्रगती ( ७) हिचा मृत्यू झाला. तर मुलगी प्रतीक्षा (३) आणि पत्नी पिंकी मनीष बहाद्दूरसिंग (२५) बचावल्या आहेत. त्‍यांना वसई-विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या दोघींची प्रकृती चिंताजनक आहे. 

पुढील लेख
गोवा : सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास बंदी घालणार