शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूग्राम , सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (16:11 IST)

सरकार पाहणार रायन इंटरनॅशनल स्कूलचा तीन महिने कारभार

ryan international school
रायन इंटरनॅशनल शाळा आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. प्रद्युम्नच्या हत्येनंतर गेल्या दहा दिवसांपासून ही शाळा बंद होती. पुढील तीन महिने या शाळेचा कारभार सरकार पाहणार आहे. मात्र इतक्या लवकर शाळा सुरु करण्यास प्रद्युम्नचे वडिल वरुण ठाकूर यांनी विरोध दर्शवला आहे. यामुळे तपास प्रक्रियेवर अडथळे निर्माण होतील आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होईल असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.