नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून रखडलेले कांद्याचे लिलाव सोमवारपासून सुरु होत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि व्यापाऱ्यांची एक बैठकही घेण्यात आली. यानंतर छाप्यानंतरचा वाद थोडा निवळलेला दिसतोय. तसंच जिल्हाधिकाऱ्यांनीही सर्व व्यापाऱ्यांना लिलाव सुरु करण्याचं आवाहन केलं.
दुसरीकडे नाशकातील साठेबाज कांदा व्यापाऱ्यांनी दुबई हवालामार्फत काळ्याचं पांढरं केल्याचा संशय आता निर्माण होतोय. दुबईतून कांदा निर्यातीच्या नावाखाली पैसे आणले- गेले. मात्र कांदे निर्यात झालेच नसल्याचा संशय ईडीला आहे. तसंच 3 टक्के व्याजदरानं पैसे देण्याचा उद्योगही काही जण करत असल्याचं तपासात उघड झालं आहे.