मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (16:30 IST)

अबब रशिया आढळला तब्बल एक टनाचा मासा

रशियाच्या समुद्रात तब्बल एक टनाचा मासा आढळला आहे. आता या माशाचे  फोटो सोशल मीडियात मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले आहेत.  पश्चिम रशियातील साखलिन (Sakhalin) येथील समुद्रात मच्छीमारांच्या जाऴ्यात जवळपास 1,100 किलो इतक्या वजनाचा Sunfish या जातीचा मासा सापडला. जगभरातील आतापर्यंत सापडलेला हा सर्वाधिक मोठा मासा असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, हा मासा पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. येथील एका मच्छीमाराने सांगितले की, आतापर्यंत अनेक मासे पडकले. मात्र समुद्रात इतका मोठा मासा असतो, याबाबत  मला काहीच माहिती नव्हती. समुद्रातील काही डॉल्फीन माशांचा आकार 1.5 मीटरपर्यंत असल्याचे माहीत आहे. मात्र, Sunfish सारखा इतका मोठा मासा समुद्रात असतो, ते आता प्रत्यक्षात पाहिल्यावर समजले, असेही त्या मच्छीमाराने सांगितले.