सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (16:23 IST)

भयंकर व्यायाम : एकाचे गुप्तांग वजनाच्या प्लेटच्या होलमध्ये अडकले

चुकीचा व्यायाम अनेकदा घातक ठरतो.  अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. जर्मनीमधील वॉर्म शहरात एका व्यक्तीचं गुप्तांग वजनाच्या प्लेटच्या होलमध्ये अडकलं. मात्र ही वजनाची प्लेट या व्यक्तीच्या गुप्तांगात कशी अडकली हे अद्याप समजू शकलेले नाही.

यामध्ये  व्यायाम करत असताना त्या व्यक्तीचे गुप्तांग 2.5 किलो वजनाच्या प्लेटमध्ये अडकले. त्यानंतर  तेथील उपस्थितांना या व्यक्तीला अवघडलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात गेल्यानंतर ती प्लेट गुप्तांगातून वेगळी कशी करायची असा प्रश्न डॉक्टरांना पडला. कारण ती प्लेट गुप्तांगापासून वेगळी करण्यासाठी गरजेची साधनं तेथे उपलब्ध नव्हती. म्हणून मदतीसाठी तेथे अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आलं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ग्राईंडर आणि हायड्रॉलिक कटरच्या साहाय्याने ती प्लेट कापून काढली. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नानंतर पाच तुकडे करून ती प्लेट त्या व्यक्तीच्या गुप्तांगापासून वेगळी करण्यात आली.

या ऑपरेशन नंतर फायर फाइटर्सनं ही सर्व घटना फेसबुक पेजवर शेअर केली. यामध्ये गुप्तांगात अडकलेल्या प्लेट्सच्या तुकड्याचे फोटो शेअर केलेले आहे.