पोटातून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून दारूची बाटली बाहेर काढली, डॉक्टरही थक्क झाले
नेपाळमध्ये, एका 26 वर्षीय व्यक्तीच्या पोटातून दारूची बाटली बाहेर काढली. रौतहाट जिल्ह्यातील गुजरा नगरपालिकेतील नुरसाद मन्सुरी यांच्या पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांच्या पोटात दारूची बाटली सापडली.वृत्तानुसार, त्याला पाच दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि अडीच तासांची शस्त्रक्रिया करून बाटली यशस्वीरित्या काढण्यात आली होती. या प्रकरणामुळे डॉक्टरही थक्क झाले .एका डॉक्टरने सांगितले की, "बाटलीने त्याचे आतडे फाटले होते, त्यामुळे विष्ठा बाहेर पडली होती आणि आतड्यांना सूज आली होती, पण आता तो धोक्याबाहेर आहे." पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूरसादच्या मित्रांनी त्याला दारू पिण्यास भाग पाडले असावे आणि त्याच्या गुदामार्गातून जबरदस्तीने पोटात बाटली घातलेली असावी. अहवालात म्हटले आहे की, नूरसादच्या पोटात गुदामार्गातून बाटली घातली गेल्याचा संशय आहे, सुदैवाने त्याला इजा झाली नाही.
याप्रकरणी रौतहाट पोलिसांनी शेख समीम याला अटक केली असून नुरसदच्या काही मित्रांचीही चौकशी केली आहे. "आम्हाला समीमवर संशय असल्याने आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी करत आहोत," असे चंद्रपूरच्या पोलिसांनी सांगितले. रौतहाटचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की ,नुरसादचे आणखी काही मित्र फरार असून आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. पुढील तपास सुरू आहे.
Edited By - Priya Dixit