बापाने ५५ वर्षीय वृद्धाला विकली 9 वर्षांची लेक
अफगाणिस्तानात अब्दुल मलिक याने पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीला पैशासाठी ५५ वर्षीय वृद्धाला विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःचे घर चालवण्यासाठी हा पर्याय निवडावा लागला, असे तो म्हणला. एकूण आठ व्यक्तींचं त्यांचं कुटूंब आहे. चार वर्षांपासून अब्दुल अफगाणिस्तानच्या बडघिस प्रांतात एका डिस्प्लेसमेंट कॅम्पमध्ये (स्थलांतरित लोकांची वस्ती) त्याच्या परिवारासह राहतो. रोजंदारी करून त्याला दिवसाला जेमतेम दोन युरो (१७२ रुपये) मिळतात.
तालिबान सत्तेत आल्यापासून तिथली परिस्थिती आणखी बिकट होत आहे. "घर चालवणे आता पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाले आहे. माझ्या मुलीला लग्नासाठी विकण्याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय उरला नव्हता.", असे अब्दुल म्हणाला.
दोन लाख अफगाणी (१ लाख ६४ हजार रुपये) किमतीच्या नगद, जमीन आणि मेंढाऱ्यांच्या मोबदल्यात अब्दूलने त्याने हा व्यवहार केला. मात्र, इतके पैसे मिळूनही अब्दुल मलिक हा कर्जातून बाहेर येणार नाही, असे सांगतो.