रविवार, 2 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (14:18 IST)

निर्दयीपणा: महिलेने पेंटरची दोरी कापली, इमारतीच्या 26 व्या मजल्यावर लटकले,फोटो व्हायरल

Cruelty: Woman cuts painter's rope
सोशल मीडियावर सतत कोणत्या न कोणत्या बातम्या व्हायरल होतात.त्यातील काही बातम्या चांगल्या असतात तर काही संताप देणाऱ्या असतात . सध्या सोशल  मीडियावर एक बातमी पाहिल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळत आहे. यामध्ये एका महिलेने रागाच्या भरात इमारतीच्या बाहेर लटकलेल्या दोन पेंटरची दोरी कापून घेतली कारण त्यांनी त्या दिवशी कामावर येणार असल्याचे सांगितले नाही. महिलेने त्या पेंटरांना 26व्या मजल्यावर लटकत सोडले. हे वृत्त थायलंडमधून सांगण्यात येत आहे.
 
व्हायरल झालेल्या बातमीनुसार,दोरीने लटकलेले हे दोघे पेंटर 26 व्या मजल्यावरील रहिवाशांना खिडकी उघडण्यासाठी आणि आत घेण्यास सांगत आहे. 
 
पेंटर सॉन्गने थाई मीडियाला सांगितले की, तो आणि त्याचे दोन मित्र इमारतीतील तडे दुरुस्त करण्यासाठी आले होते, पण त्यांच्यासोबत अशी घटना घडली की त्यांनी कल्पनाही केली नव्हती. महिलेने कोणत्या कारणासाठी दोरी कापली याबाबत ठोस कारणे काहीही सांगता येत नाही.