गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (08:40 IST)

आश्चर्यजनक ! 24 वर्षांची महिला.. 21 मुलांची आई, ती चिमुकल्यांना कशी सांभाळते जाणून घ्या

सोशल मीडियावर दररोजच्या अशा काही बातम्या व्हायरल होतात जे लोकांना आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मीडियावर अशीच एक बातमी व्हायरल होत आहे. ही बातमी आहे रशियेच्या एका महिलेची . रशियातील एका 24 वर्षीय महिलेने नुकतेच आपल्या 21व्या मुलाचे स्वागत केले आहे. एका महिलेचा सर्व मुलांसोबतचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. महिलेने इन्स्टाग्रामवर हे छायाचित्र पोस्ट करताच लोक आश्चर्यचकित झाले. मात्र, महिलेने स्वत: याबाबतची संपूर्ण माहिती दिल्यावर लोकांना सत्य समजले.
 
ही महिला रशियातील एका शहरातील आहे. क्रिस्टीना ओटोर्क असे या महिलेचे नाव आहे. ही महिला नुकतीच 21 व्या अपत्याची आई झाली आहे. तिने स्वतः सर्व मुलांना जन्म दिला नसला तरी त्यातील काही दत्तक तर काही सरोगसीद्वारे जन्माला आले आहेत. क्रिस्टीना ओटर्कला मुलांचे संगोपन करण्याची इतकी आवड आहे की ती तिच्या सर्व मुलांसह आनंदी आहे.
 
या महिलेने तिच्या सर्व 21 मुलांची काळजी घेण्यासाठी 16 आया ठेवल्या आहेत. महिलेचा नवरा मोठा व्यापारी आहे. गेल्या वर्षी मार्च ते या वर्षी जुलै या कालावधीत या महिलेने सरोगेटद्वारे पालक होण्यासाठी सुमारे 1 कोटी रुपये खर्च केले आहेत. इतकेच नाही तर ती महिला तिच्या सर्व काळजीवाहू नोकरांवर करोडो रुपये खर्च करते.
 
महिलेच्या पतीचे हे दुसरे लग्न असल्याचेही सांगितले आहे. पहिल्या लग्नापासून दोन मुले देखील होती आणि ती मुले देखील या महिलेसोबत राहतात, त्यांच्यासह या महिलेला एकूण 21 मुले आहेत. एका मुलाखतीत महिलेने सांगितले की ती एक व्यावहारिक आई आहे. ती म्हणाली की मी सदैव मुलांसोबत असते जेणेकरून ते सर्व आनंदी असतील आणि त्यांना आईचे प्रेम मिळेल. .
त्या महिलेने असेही सांगितले की, ती सर्व काही करते जी प्रत्येक आई करते. ती म्हणाली की ती कर्मचार्‍यांच्या वेळापत्रकाच्या नियोजनापासून कुटुंबासाठी खरेदी करण्यापर्यंत सर्व काही हाताळते. ही महिला सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे, ती सतत तिच्या मुलांबद्दल अपडेट्स देत असते.