1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (14:56 IST)

तालिबानची क्रूर शिक्षा पुन्हा सुरु होणार,संस्थापक सदस्य तुराबी यांनी घोषणा केली

अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीत लोकांची अडचन कमी होण्याची नावच घेत नाही.लोकांना आज ही भीतीच्या आणि क्रूर शिक्षेच्या सावट खाली जगावे लागणार.जसे की तालिबानने पूर्वीच सांगितले होते.की ते शरिया कायद्या लागू करणार,परंतु आता त्याचे संस्थापक सदस्य मुल्ला नुरद्दीन तुराबी यांनी घोषणा केली आहे की अफगाणिस्तानात जुन्या सरकारच्या काळात दिलेल्या क्रूर शिक्षा पुन्हा लागू केल्या जातील.
 
अहवालांनुसार, तालिबानचे संस्थापक सदस्य मुल्ला नूरुद्दीन तुराबी म्हणतात की,या वेळी देखील अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीत लोकांचे हात कापण्यासारख्या क्रूर शिक्षेची मालिका सुरूच राहील. तुराबी म्हणाले की,चुकीचे काम करणाऱ्यांचे खून आणि अंग विकृती करण्याचे युग लवकरच परत येईल.
 
तुराबी म्हणाले की,अशा शिक्षेमुळे लोकांमध्ये भीती वाढते.अशा शिक्षा सार्वजनिकरित्या दिल्या जाव्यात की नाही यावर तालिबान मंत्रिमंडळ विचार करत आहे आणि त्याचे धोरण लवकरच बनवले जाईल.तुराबी म्हणाले की आम्ही इस्लामचे पालन करू आणि कुराणच्या आधारावर आपले कायदे निश्चित करू.
 
तालिबानने या महिन्यात आपल्या काळजीवाहू सरकारची घोषणा केली आणि पुन्हा गुन्हेगारांना शरिया कायद्यानुसार क्रूर शिक्षा देण्याची आणि महिलांवर कठोर निर्बंध लादण्याची तयारी केली आहे. यासाठी तालिबानच्या चांगल्याचा प्रचार आणि वाईटाला रोखण्याचे काम ही मंत्रालयाने सुरू केले आहे.