कोव्हिड-19 विरोधातील 'कोव्हिशिल्ड' लशीला यूके सरकारने आता मान्यला दिलीये.
कोरोनाविरोधी लस 'कोव्हिशिल्ड'ला मान्यता मिळाली असली. तरी, यूकेमध्ये जाणाऱ्या भारतीयांना क्वारंन्टाईन व्हावं लागणार का नाही? याबाबत अनिश्चितता मात्र अजूनही कायम आहे.
याचं कारण, सद्यस्थितीत भारताचा त्या देशांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. ज्यात, लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पूर्णत: लसीकरण झालेलं मानण्यात येईल.
लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी नियम
चार ऑक्टोबरपासून कोरोनाविरोधी लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी यूके सरकारचे नवीन नियम लागू होणार आहेत.
यूके सरकारच्या माहितीनुसार खालील लोकांना पूर्णत: लसीकरण झालेलं मानण्यात येईल
यूके, यूरोप, अमेरिका किंवा परदेशात यूकेच्या लसीकरण मोहिमेअंतर्गत लस घेतली असेल.
ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्का, फायझर-बायो-एनटेक, मॉडेर्ना किंवा जॉन्सन लस घेतली असेल.
अॅस्ट्राझेन्का 'कोव्हिशिल्ड', अॅस्ट्राझेन्का व्हॅक्झेवेरिया आणि मॉडेर्ना तकेडा या लशींना मान्यता.
यूकेमध्ये प्रवेश करण्याआधी 14 दिवस लशीचे दोन्ही डोस घेतलेले असले पाहिजेत.
यूकेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला लशीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस झाल्याचा सरकारी पुरावा सादर करावा लागणार आहे.
भारतीयांना व्हावं लागेल क्वारंन्टाईन?
यूके सरकारने अॅस्ट्राझेन्काच्या भारतीय बनावटीच्या 'कोव्हिशिल्ड' लशीला मान्यता दिली असली. तरी, लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना यूकेमध्ये गेल्यानंतर क्वारंन्टाईन व्हावं लागेल का? यावर प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे.
याचं कारण, सद्यस्थितीत भारताचा त्या देशांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. ज्यात, लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पूर्णत: लसीकरण झालेलं मानण्यात येईल.
यूकेमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारने रेड, अंबर आणि ग्रीन लिस्ट तयार केली आहे. या लिस्टमध्ये जगभरातील विविध देशांचा समावेश करण्यात आलाय. सद्यस्थितीत भारत यूके सरकारच्या रेड लिस्टमध्ये नाहीये.
यूके सरकारच्या नियमावलीप्रमाणे,
'अंबर लिस्ट'मध्ये असलेल्या देशातून यूकेमध्ये आलेल्यांना क्वारंन्टाईन आणि कोरोना चाचणी करावी लागेल.
यूके सरकारच्या लिस्टमध्ये भारताचा समावेश 'अंबर लिस्ट' मध्ये करण्यात आलाय
कोव्हिशिल्ड लशीला मान्यता देण्यात आली असली. तरी, भारतातील लसीकरण मोहीमेला अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे, सद्यस्थितीत भारतातून यूकेला प्रवास करणाऱ्या भारतीयांना क्वारंन्टाईन व्हावं लागणार असं चित्र दिसतंय.
भारतात सद्यस्थितीत 721 दशलक्ष लोकांना कोव्हिडशिल्ड लस देण्यात आलीये.
यूके सरकारच्या नियमावलीत दिलेल्या माहितीनुसार,
पूर्णत: लसीकरण झालेल्या नियमात बसत नसलेल्यांना घरी किंवा रहात्या ठिकाणी 10 दिवस क्वारंन्टाईन करावं लागेल. यूकेत आल्यानंतर दोन दिवसांच्या आत आणि आठ दिवसांच्या आत कोरोना चाचणीसुद्धा करावी लागेल.
भारतातून होणारा विरोध
भारतीय बनावटीच्या कोरोनाविरोधी लशीला यूके सरकारने मान्यता दिली नव्हती. त्यामुळे यूके सरकारच्या या निर्णयाला भारतातून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. यूके सरकारचा हा निर्णय पक्षपाती असल्याची टीका करण्यात आली.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हा मुद्दा यूके सरकारसोबत चर्चेत उपस्थित केला होता, अशी माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन सिंगला यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
भारताकडून होणारा विरोध पाहाता यूके सरकारने सिरम इंन्स्टिट्युटने बनवलेल्या भारतीय बनावटीच्या कोव्हिशिल्ड लशीला अखेर मान्यता दिलीये.