बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (13:43 IST)

अमेरिकेने ड्रोन हल्ल्यासाठी माफी मागितली,हल्ल्यात 10 निष्पापांचा बळी गेला

वॉशिंग्टन.काबूलमध्ये 29 ऑगस्टला झालेल्या ड्रोन हल्ल्याबद्दल अमेरिकेने प्रथमच माफी मागितली आहे.शुक्रवारी अमेरिकेने कबूल केले की या हल्ल्यात केवळ सामान्य नागरिक मारले गेले आहेत इस्लामिक स्टेटचे अतिरेकी नाहीत.अमेरिकेने याआधी या हल्ल्याचा बचाव केला होता.

अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड जे ऑस्टिन तिसरे यांनी 29 ऑगस्टला काबूलमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्याबद्दल 10 अफगाण नागरिकांचा बळी घेतल्याबद्दल माफी मागितली.

काबूल विमानतळावरील हल्ल्याने संतापलेल्या अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये ISIS-K दहशतवाद्यांविरोधात ड्रोन हल्ला केला हे उल्लेखनीय आहे. काबूल विमानतळाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर अध्यक्ष जोबायडेन म्हणाले की आम्ही हल्लेखोरांना माफ करणार नाही.
 
प्रसारमाध्यमांच्या अहवालात अमेरिकेच्या दाव्यांवर शंका उपस्थित करण्यात आल्या. या अहवालांमध्ये असे म्हटले आहे की ज्या वाहनाला लक्ष्य केले गेले तो एक अमेरिकन मानवीय  संघटनेचा कर्मचारी होता.