रविवार, 7 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (10:12 IST)

महिलेने दिला एकत्र 9 मुलांना जन्म, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

Name of these children born in Morocco in Guinness World Records
एकत्र जन्मलेली 9 मुले (Nonuplets) 19 महिन्यांनंतर त्यांच्या देशात (माली) सुरक्षितपणे परतली आहेत. या मुलांनी यावर्षी मे महिन्यात त्यांचा पहिला वाढदिवसहीसाजरा केला होता. मोरोक्कोमध्ये जन्मलेल्या या मुलांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एकाच वेळी जन्माला आल्याने आणि जिवंत राहिल्याबद्दल नोंदवले गेले. 
 
13 डिसेंबर रोजी, सर्व 9 मुले आई हलिमा सिसे आणि वडील अब्देलकादर आर्बीसह मालीची राजधानी बामाको येथे पोहोचली. यावेळी मुलांचे वडील आराबे यांनी आर्थिक मदत केल्याबद्दल माळी सरकारचे आभार मानले. मालीचे आरोग्य मंत्री डिमिनाटो संगारा म्हणाले की सरकार कुटुंबाला पाठिंबा देत राहील. 
 
मुलांची आई हलिमा सिसे प्रसूतीसाठी मालीहून मोरोक्कोला गेली होती, मुलांचा जन्म मे २०२१ मध्ये झाला होता.नऊ मुलांमध्ये 5 मुली आणि 4 मुले आहेत. मुलींची नावे कादिदिया, फतौमा, हवा, अदामा, ओमू, तर मुलांची नावे मोहम्मद 6, ओमर, इल्हादजी आणि बाह अशी आहेत. 
जेव्हा ही मुले जन्माला आली तेव्हा त्यांचे वजन 500 ग्रॅम ते 1 किलोग्रॅम दरम्यान होते. प्री-मॅच्युअर असल्याने, या सर्व मुलांचा पहिला महिना हॉस्पिटलमध्ये.ठेवण्यात आले. 
 
त्यानंतर सर्व मुले मोरोक्कोमधील एका अपार्टमेंटमध्ये राहायला गेली जिथे अॅन बोर्जा क्लिनिकचे डॉक्टर सतत मुलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवत होते.
हलिमा सिसेने नऊ मुलांना जन्म देऊन आठ मुलांची आई नाद्या सुलेमानचा विक्रम मोडला. नादियाने 2009 मध्ये आठ मुलांना जन्म दिला.

Edited By- Priya Dixit