1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 13 डिसेंबर 2021 (18:35 IST)

ओमिक्रॉन व्हेरियंट मुळे जगातील पहिला मृत्यू

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंट मुळे पहिल्या मृत्यूची पुष्टी केली आहे. ओमिक्रॉनमुळे मृत्यूची ही जगातील पहिलीच घटना आहे. जॉन्सन म्हणाले की ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार खूप वेगाने झाला आहे. आम्ही ते कधीही पाहिले नाही. जॉन्सन म्हणाले की, त्याचा संसर्ग दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दुप्पट होत आहे. याचा अर्थ आपण संसर्गाच्या वादळी लाटेचा सामना करत आहोत.
ब्रिटनचे आरोग्य सचिव साजिद जावेद म्हणाले की, ख्रिसमसच्या काळात प्रकरणे वेगाने वाढत आहेत. दररोज 5 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली जाण्याची शक्यता आहे. प्रौढांसाठी लसीच्या दोन डोसपेक्षा तिसरा डोस घेणे चांगले आहे. असे ही ते म्हणाले.