मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (11:37 IST)

इंग्लंडच्या राणीला जीवे मारण्याची धमकी

ब्रिटनमधील सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये मास्क घातलेला एक व्यक्ती राणी एलिझाबेथ द्वितीयच्या हत्येबद्दल बोलत आहे. ही व्यक्ती स्वत:ला  भारतीय शीख असल्याचा आव आणत आहे आणि म्हणत आहे की 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी त्याला राणीला मारायचे आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्कॉटलंड यार्डने तपास सुरू केला आहे.   या व्हिडीओमध्ये मास्क घातलेला हा व्यक्ती त्याचे नाव जसवंत सिंह छैल सांगत आहे. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी मला महाराणींना मारायचे आहे, असे तो म्हणतो. हा व्हिडिओ समोर येण्यापूर्वी, ख्रिसमसच्या दिवशी विंडसरच्या राणीच्या पॅलेसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना एका 19 वर्षीय व्यक्तीला क्रॉसबोसह अटक करण्यात आली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्कॉटलंड यार्डचे अधिकारी हा व्हिडिओ अटक केलेल्या तरुणाशी संबंधित आहे का याचा तपास करत आहेत. दरम्यान, मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले की, अटक केलेल्या व्यक्तीला ब्रिटनच्या मानसिक आरोग्य कायद्यांतर्गत त्याच्या मानसिक स्थितीचे मूल्यांकन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तो सध्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या देखरेखीखाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
व्हिडिओमध्ये ही व्यक्ती काय म्हणत आहे, ही व्यक्ती व्हिडिओमध्ये म्हणते, 'मला माफ करा. मी जे काही करणार आहे  त्याबद्दल मला क्षमा करा. मी राजघराण्यातील राणी एलिझाबेथच्या हत्येचा प्रयत्न करेन. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडात ज्यांनी प्राण गमावले त्यांचा हा बदला असेल.' ते पुढे म्हणतात, 'मी भारतीय शीख आहे. माझे नाव जसवंत सिंग छैल होते, माझे नाव डार्थ जोन्स आहे.'