बुधवार, 5 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 जानेवारी 2025 (10:51 IST)

अमेरिकेच्या विमानाला उतरू दिले नाही, ट्रम्प यांनी कोलंबियाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश जारी केले

America News : अमेरिकेच्या विमानाला उतरू दिले नाही याकरिता ट्रम्प यांनी या देशाविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहे. अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी एकामागून एक कठोर निर्णय घेऊन अनेक देशांमधील तणाव वाढवला आहे.
ALSO READ: श्रीलंकेने भारतीय मच्छिमारांना केली अटक, सीएम स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला मोठे आवाहन केले
मिळालेल्या महतीनुसार कोलंबिया सरकारने अमेरिकेतून स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या दोन विमानांना उतरू न दिल्यानंतर अमेरिका आणि कोलंबियामधील संबंध तणावपूर्ण बनले आहे. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियाविरुद्ध अनेक कठोर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहे. ट्रम्प यांनी ही कारवाई केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर घोषणा केली आहे की ते कोलंबियाविरुद्ध शुल्क, व्हिसा निर्बंध आणि इतर सूडात्मक उपाययोजनांचे आदेश देत आहे. ट्रम्प म्हणाले की हे फक्त सुरुवातीचे पाऊल आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदेशीर आणि कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी, कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी म्हटले होते की, जोपर्यंत लोकांना आदराने वागवले जात नाही तोपर्यंत ते स्थलांतरितांना घेऊन येणारी विमाने स्वीकारणार नाहीत.

Edited By- Dhanashri Naik