1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. Trump's daughter Ivanka

तुझे वडील देशाची वाट लावत आहेत...

ख्रिसमसच्या सुट्ट्यांसाठी इवान्का ट्रम्प तिच्या तीन मुलांसोबत बाहेरगावी निघाली होती. न्यूयॉर्कच्या जॉन एफ. केनेडी विमानतळावरुन तिने जेटब्ल्यू एअरलाईन्सचं विमान पकडलं. मात्र आपल्या विमानात तिला पाहताच एका सहप्रवाशाचा संताप अनावर झाला होता. त्याला इतका राग आला की तो विमानात जोर जोरात ओरडू लागला आणि म्हणाला ‘तुझे वडील देशाची वाट लावत आहेत. (इवान्काला उद्देशून) ही मुलगी आपल्या फ्लाईटमध्ये का आहे? तिने खाजगी विमानाने जायला हवं’ असा टोमणा मारला. 
 
संबंधित प्रवाशाच्या खांद्यावर दोन मुलंही होती. इवान्काने मात्र त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि मुलांचं लक्षही तिने विचलित करण्याचा प्रयत्न केला.यानंतर आणखी गोंधळ होऊ नये म्हणून विमान कंपनीच्या कर्मचार्‍यांनी त्या व्यक्तीला त्याच्या कुटुबीयांसोबत विमानाबाहेर काढले.
पुढील लेख
अल्लेप्पो शहरावर लष्कराने पूर्णपणे नियंत्रण मिळवले