शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जुलै 2020 (09:31 IST)

ब्रिटनमध्ये नागरिकांना एक अजब सल्ला, कमी खा,वजन कमी करा

ब्रिटनने आपल्या देशातील नागरिकांना एक अजब सल्ला दिला आहे. ब्रिटनच्या ज्यूनिअर आरोग्य मंत्री हेलेन वेटली यांनी लोकांना कमी खान्याचा आणि वजन नियंत्रित ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
 
जगभरात कोरोनामुळे जे मृत्यू होत आहेत, त्यात प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेले, आधीपासून गंभीर आजार असलेले आणि स्थूलपणा असलेले व्यक्ती कोरोनाचे बळी ठरत आहेत. या आधारावरच हेलेन वेटली म्हणाल्या की, “स्थूलपणामुळे कोरोना व्हायरसचा धोका अधिका वाढतो. यासाठी लोकांनी कमी खायला हवे आणि वजन कमी करण्याकडे त्यांचा कल हवा. तसेच ४० हून अधिक बॉडी मास्क इंडेक्स (BMI) असणाऱ्यांनाही कोरोनाचा अधिक धोका असतो.”
 
ब्रिटन सरकारने नागरिकांचा स्थूलपणा घालविण्यासाठी उपाययोजना हाती घेतलेल्या आहेत. जंक फूडच्या जाहीरातींवर बंदी घालण्यात आलेली आहे. ब्रिटनच्या आरोग्या आणि सामाजिक कल्याण विभागाने सोमवारी निर्देश जारी केले की, रात्री ९ च्या आधी टीव्ही आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अधिक फॅट असलेले पदार्थ, साखर आणि मीठ असणाऱ्या जंक फुडची जाहीरात करता येणार नाही. एवढेच नाही तर आरोग्यास हीतकारक नसलेल्या पदार्थांवरील एकावर एक फ्री सारख्या ऑफरही बंद करण्याचा विचार सरकार पातळीवर सुरु आहे. तसेच दुकाने आणि रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक पदार्थावर कॅलरी लेबल लावण्याची गरज असल्याचा विचार केला जात आहे.