रशियाचे सैन्य युक्रेनच्या भूमीवर सतत पुढे जात आहे. दोन दिवसांपासून क्षेपणास्त्र, रॉकेट लाँचर आणि सैन्यासह सर्व आघाड्यांवर रशियन सैनिक आणि युक्रेनियन सैनिकांमध्ये युद्ध सुरू आहे. दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे वक्तव्य समोर आले आहे. आपल्या भाषणात त्यांनी युक्रेन सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आम्ही युक्रेनवर कब्जा करणार नाही, पण तेथील राज्यकर्ते नाझी...