गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जानेवारी 2023 (11:34 IST)

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने केले दुसरे लग्न

अंडरवर्ल्ड डॉन आणि जागतिक दहशतवादी दाऊद इब्राहिमने पाकिस्तानमध्ये दुसरे लग्न केले आहे. दाऊदने पाकिस्तानातील पठाण कुटुंबातील तरुणीशी लग्न केले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेसमोर (NIA) दाऊदची बहीण हसिना पारकरच्या मुलाने सप्टेंबर 2022 रोजी दिलेल्या एका वक्तव्यात हा मोठा खुलासा केला 
 
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दहशतवादी नेटवर्कचा खुलासा करताना तपास यंत्रणेने नुकतेच मुंबईसह अनेक ठिकाणी छापे टाकून अनेकांना अटक केली होती. एनआयएने न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले. या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा झाला आहे. एनआयएने सप्टेंबर २०२२ मध्ये दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह याचे बयाण नोंदवले होते, ज्यामध्ये अलीशाहने अतिशय खळबळजनक खुलासा केला होता. अलीशाहने निवेदनात सांगितले आहे की, दाऊद इब्राहिमचे मामाचे पाकिस्तानात लग्न झाले आहे. त्याची दुसरी पत्नी पाकिस्तानातील पठाण कुटुंबातील आहे. 

निवेदनात अलीशाहने म्हटले आहे की, दुसरे लग्न केल्यानंतर दाऊद इब्राहिमने त्याची पहिली पत्नी महजबीन हिला घटस्फोट दिल्याचे जगाला सांगितले आहे. पण अलीशाह च्या म्हणण्यानुसार, तसे अजिबात नाही. 
 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरे लग्न ही देखील दाऊदची एक युक्ती असू शकते, 
 
 दाऊदची पहिली पत्नी महजबीन हिला अलीशाह जुलै 2022 मध्ये दुबईत भेटला होता. महजबीननेच दाऊद इब्राहिमच्या दुसऱ्या लग्नाबद्दल अलीशाहला सांगितले. अलीशाहच्या वक्तव्यानुसार दाऊद इब्राहिम आता कराचीच्या डिफेन्स भागात अब्दुल्ला गाझी बाबा दर्ग्याच्या मागे रहीम फकीजवळ राहतो.  

Edited By- Priya Dixit