शनिवार, 6 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 सप्टेंबर 2024 (12:24 IST)

न्यूयार्कच्या स्वामी नारायण मंदिरात तोडफोड, आरोपींवर कारवाई करण्याची मागणी

Hindu community
न्यूयार्क, यूएसए येथे भारतीय वाणिज्य दूतावासने मेल्व्हील येथे स्वामीनारायण मंदिरात तोडफोड केल्याचा निषेध केला असून त्यांनी हे प्रकरण अमेरिकन कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या समोर नेऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

या शिवाय हिंदू- अमेरिकन फाउंडेशनने अमेरिकेच्या न्याय विभागाला प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली. न्यूयार्क मधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सोशल मीडिया X प्लॅटफॉर्म वर पोस्ट करत या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.  

त्यांनी आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. न्यूयॉर्कमधील मंदिर तोडफोडीची घटना कॅलिफोर्निया आणि कॅनडातील घटनांसारखीच आहे. "सिख फॉर जस्टिस" चे गुरपतवंत पन्नू यांनी अलीकडेच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये HAF सह हिंदू आणि भारतीय संस्थांना धमकी देण्यात आली आहे, ही घटना न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया आणि कॅनडामधील मंदिरांमध्ये घडली आहे, असे हिंदू अमेरिकन फाउंडेशनने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. जे हल्ले झाले सारखेचआहे. 
Edited by - Priya Dixit