नोटबंदी जाळपोळ लुटमार सुरु
देशातील काळा पैसा रोखण्यासाठी भारताप्रमाणे व्हेनेझुएला देशाने त्यांच्या देशातील नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मडुरो यांनी 100 बोलिव्हर बील ही सर्वोच्च नोट चलनातून रद्द केली. भारताप्रमाणे व्हेनेझुएलाच्या जनतेने सरकारच्या निर्णयाला साथ दिलेली नाही. व्हेनेझुएलामध्ये या निर्णया विरोधात हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या, लुटालुटीच्या घटना घडल्या आहेत. मात्र हा जनतेचा राग पाहता त्यांनी आपला निर्णय थांबविला आहे.हा निर्णय उशिरा होईल मात्र रद्द होणार नाही असेही त्यांच्या सरकारने सागितले आहे. सध्या या देशात महागाईचा कळस गाठला आहे. त्यामुळे नोटबंदीचा निर्णय घेतला गेला आहे.