गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

बॉयफ्रेंडवरुन रस्त्यावरच भिडल्या तरुणी, हाणामारीचा Video Viral

रस्त्यावर भांडत होत असताना सर्वांनीच कधी न कधी पाहिले असेल. दरम्यान रस्त्यावर खूप गर्दी जमते आणि काही लोक भांडण करणार्‍यांना समवण्याचा प्रयत्न करताना देखील दिसतात. मात्र अलीकडे अशी कुठलीही घटना घडल्यास त्याचा व्हिडिओ व्हायरल होयला वेळ लागत नाही. आता पाकिस्तानचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात चिनी महिला पाकिस्तानी महिलेशी भांडताना दिसत आहे.
 
यात एक चिनी महिला पाकिस्तानच्या रस्त्यावर एका पाकिस्तानी महिलेशी भांडत असून तिच्या केसांना धरून ओढताना दिसत आहे. हा प्रकार पाहून रस्त्यावरुन जात असलेले थक्क झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताच लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
 
घर के कलेश नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून यात एक चिनी महिला रस्त्याच्या कडेला एका महिलेशी केस धरुन मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओ कॅप्शनमध्ये हा पाकिस्तानचा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे.
 
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर हजारो व्यूह्ज आणि अनेक कमेट्स बघायला मिळत आहेत.