शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 जुलै 2022 (13:42 IST)

ज्वालामुखीच्या तोंडावर जाऊन सेल्फी घेताना 50 फूट खाली कोसळला आणि ...

सेल्फी घेण्याच्या नादात बऱ्याच वेळा अपघाताला सामोरी जावे लागते. इटलीतून सेल्फी घेण्याच्या नादात एकाचा जीव धोक्यात गेल्याची बातमी समोर आली आहे.  इटलीतील माऊंट वेसुवियस ज्वालामुखीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर एका पर्यटकाला सेल्फी घ्यायचा होता. पण सेल्फी काढण्याच्या नादात तो या ज्वालामुखीच्या आत कोसळला. सुदैवाने ते या अपघातातून बचावले. हा ज्वालामुखी इटलीतील कॅम्पानिया येथे आहे.  
 
फिलिप पॅरोल हे बाल्टिमोर (अमेरिका) येथील रहिवासी आहेत. आठवड्याच्या शेवटी, ते  इटलीमध्ये वास्तव्यास असलेला आपल्या कुटुंबासह हा ज्वालामुखी पाहण्यासाठी गेले .ज्वालामुखीच्या प्रतिबंधित मार्गाने हे कुटुंब शिखरावर पोहोचले होते.
जिथून हे कुटुंब ज्वालामुखीच्या शिखरावर पोहोचले, तिथे 'नो एंट्री 'चा फलकही होता. या कुटुंबाने प्रवासी निर्बंधांकडे दुर्लक्ष केल्याचे इतर अनेक मीडिया रिपोर्ट्समधूनही समोर आले आहे. 
 
हे कुटुंब 4 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या ज्वालामुखीच्या शिखरावर पोहोचले. त्यानंतर फिलिप कॅरोलने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फोन घसरला आणि विवरात (ज्वालामुखीच्या तोंडात) गेला. 
 
यानंतर फिलिपने फोन काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ही ज्वालामुखीच्या आत पडले. पाओलो कॅपेलीने सांगितले की तो (फिलिप) भाग्यवान आहे,  जर तो अडकला नसता तर तो 300 मीटर खाली गेला असता आणि खड्ड्यात राहिला असता. इटलीमध्ये असलेल्या या ज्वालामुखीचा व्यास 450 मीटर आणि खोली 300 मीटर आहे.  
 
फिलिपच्या पाठीवर अनेक दुखापतीच्या खुणा आहेत. हा अपघात झाला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या मार्गदर्शकांनी पलीकडून ही घटना पाहिली. यानंतर ते  फिलिपच्या मदतीला धावले . या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी फिलिपला ताब्यात घेतले होते. फिलिपला कोणत्या आरोपांना सामोरे जावे लागेल हे स्पष्ट नाही. या अपघाताचा व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती ज्वालामुखीच्या शिखरावर असल्याचे सांगताना दिसत आहे.  तसे, हा ज्वालामुखी 1944 पासून सुप्त आहे आणि त्यातील शेवटचा मोठा उद्रेक 1631 मध्ये झाला होता.