शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2022 (18:49 IST)

अनैतिक संबंध बनवले नाही या वरून पत्नीची कढईत उकळून निर्घृण हत्या, आरोपी पती फरार

एका अमानुष घटनेत, पाकिस्तानच्या कराची शहरात राहणाऱ्या सहा मुलांच्या आईला तिच्या पतीने कढईत उकळून ठार मारले. मृत 32 वर्षीय नर्गिसचा मृतदेह गुलशन-ए-इकबालच्या ब्लॉक 4 मध्ये असलेल्या एका खाजगी शाळेच्या मोठ्या भांड्यात आढळून आला. पीडितेच्या 15 वर्षीय मुलीने पोलिस हेल्पलाइनवर कॉल केल्यानंतर मोबिना टाऊन पोलिस घटनास्थळी पोहोचले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची क्रूरता पाहून पोलीस अधिकारीही हैराण झाले.
 
प्राथमिक तपासाचा तपशील शेअर करताना एसएसपी अब्दुर रहीम शेराझी यांनी सांगितले की, महिलेचा पती आशिक हा बाजपूर येथे रहिवासी असून शाळेत वॉचमन म्हणून काम करत होता आणि कुटुंबासह शाळेच्या क्वार्टरमध्ये राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही शाळा आठ महिन्यांपासून बंद होती.
 
घटनेनंतर आरोपी आपल्या तीन मुलांसह फरार झाला असून, उर्वरित तीन मुले पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी पुढे सांगितले की, प्राथमिक तपास आणि मुलांच्या जबानीवरून संशयिताने आधी उशीच्या साहाय्याने गळा आवळून पत्नीची हत्या केली आणि नंतर मुलांदेखत एका कढईत तिला उकळवले, असे दिसून आले आहे. या घटनेत महिलेचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला.
 
या घटनेमागचे खरे कारण अद्याप समजू शकले नाही; मात्र, पतीने पत्नीला अवैध संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि ती पाळण्यास नकार दिल्याने तिचा खून करण्यात आल्याचे वृत्त आहे.या घटने नंतर आरोपी पती फरार झाला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे दोन सिमकार्ड आहेत पण त्याने दोन्ही सिमकार्ड बंद केले आहेत. लवकरच आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यात येईल.