सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 20 फेब्रुवारी 2024 (15:31 IST)

महिलेने 17 वेळा गरोदर असल्याचे नाटक करून फसवले

एका महिलेने 17 वेळा गरोदर असल्याचे भासवून घोटाळा केला. कपड्यात उशी घेऊन ती फिरायची. आता ती  तुरुंगात आहे. तिने  98 लाखांची फसवणूक केली आहे. ही रक्कम सरकार ने मुलांना आर्थिक मदत म्हणून दिली होती.बार्बरा आयोले असे 50 वर्षीय महिलेचे नाव आहे.

तिच्या बनावट गर्भधारणेमुळे ती केवळ सरकारी आर्थिक मदतीचा फायदा घेत नव्हती तर ती वारंवार ऑफिसमधून लांब रजा  घेत होती ती 2000 साला पासून हे फसवेगिरी करत होती. म्हणजे ती वयाच्या 24 वर्षांपासूनही  काम करत होती जेव्हा बार्बराला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, केवळ 5 गर्भधारणा यशस्वी झाली आणि 12 गर्भपात झाले तिने सांगितले की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ती शेवटची गरोदर राहिली होती त्यावर पोलिसांनी ती खोटे बोलत असल्याचे सांगितले. या संपूर्ण 9 महिन्यांत पोलीस तिच्यावर लक्ष ठेवून होते. 

फसवणूक करण्यासाठी बनावट कागदपत्रांसह इटलीच्या राजधानीतील क्लिनिकमधून जन्म प्रमाणपत्रे चोरीला गेल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले बार्बरा वर आरोप आहे की तिने तिच्यापोटावर उशी बांधली होती. जेणे करून लोकांना ती गरोदर असल्याचे भासेल. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. 
 Edited by - Priya Dixit