गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

आई-वडील, बायको, पोरं सर्व भाड्याने!

टोकियो-जपानमध्ये एक वेबसाइट खूप प्रसिद्ध होत आहे ज्याद्वारे आपण भाड्याने आई- वडील, बायको-पोरं मिळवू शकता. ही सेवा घेण्यासाठी ग्राहकांकडून चांगलीच रक्कम वसूल केली जात आहे.
 
आपण बाजारातून किंवा ऑनलाईन खरेदी करत असाल परंतू आज आम्ही अश्या जागेबद्दल माहीत देत आहोत जिथून आपण काहीही खरेदी करू शकता. येथे अश्या वस्तू विकल्या जातात ज्याबद्दल आपण कल्पनादेखील करू शकत नाही.
जपानी वेबसाइट रेंटएवाइफओट्टावा.कॉम वर आपण अंडरगार्मेंट्सपासून आई-वडील, बायको- पोरं देखील भाड्यावर घेऊ शकता. आपण एकटे असाल तर आपल्या आवडीप्रमाणे मेल किंवा फीमेल मित्रही मिळवू शकता. येथे आपल्याला लाड करणारे आई-वडील आणि बायकोही भाड्यावर मिळते. तशीच भाड्याने अंडरगार्मेंट उपलब्ध करवणारी ही एकमेव साईट आहे.
 
आपल्याला कंटाळवाणी वाटत असेल आणि गोंडस मुलांसोबत वेळ घालवू इच्छित असाल तर ते ही येथे उपलब्ध आहे. आपल्याकडे मुलांच्या होमवर्कसाठी वेळ नसेल तर या साईटवर ती सुविधाही उपलब्ध आहे.