अखेर कॅनबरात शांततेत रॅली
कॅनबरात हजारो सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात बिजींग ऑलिंपिक रॅली अखेर यशस्वीपणे पार पडली. गेल्या दोन दिवसांपासून ऑस्ट्रेलियात चीन समर्थक आणि तिबेटी समर्थकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे कॅनबराला युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
काल या दोनही समर्थकांमध्ये भीषण संघर्ष झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन सरकारने चिंता व्यक्त केली होती. या घटनेनंतर सरकारने पोलिस सुरक्षेत आणखी वाढ केली होती.
आज 16 किलो मीटरच्या या रॅलीत सुमारे 10 हजार चीन समर्थ सहभागी झाले होते. त्यांनी त्यांच्या हातात चीनचे समर्थन करणारे बँनर्स धरले होते, तसेच चीनच्या समर्थनात ते घोषणा देत होते.