1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

अमेरिकेतील पावसात 16 ठार

अमेरिकेतील पावसात 16 ठार
अमेरिकेच्या काही भागांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यात आतापर्यंत 16 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

काही दिवसांपूर्वी शिकागोच्या उत्तर भागाला वादळाने झोडपले होते, त्या पाठोपाठ आता पुरामुळे येथील जनजीवणावर विस्कळीत झाले आहे.

नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. अनेक ठिकाणच्या फोन लाइन्सही उखडून पडल्याने या भागाचा संपर्कही तुटला आहे. सरकारने या भागात मदत कार्य सुरू केले आहे.
About Writer
भाषा