1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

अलकायदाचे आता पुस्तकही.....

विविध माध्यमातून जगभरात केवळ दहशतवाद पसरविण्याचे मार्ग शोधणार्‍या अलकायदा या दहशतवादी संघटनेने पुस्तकाचाही आधार घेतला आहे. बीन लादेन नंतर अलकायदाचा सर्वेसर्वा समजल्या जाणार्‍या अयमान अल जवाहरी ने 212 पानांचे एक पुस्तक प्रसिद्ध केले आहे.

या पुस्तकात त्याने तुरुंगात कैद असणार्‍या आपल्या सहकार्‍यांना चांगलेच फटकारले आहे.अलकायदाच्या मीडिया प्रभारी समजल्या जाणार्‍या अल साहब याने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.जवाहारीने तुरुंगात बंद बुद्धिजिवी इस्लामी तज्ज्ञांचीही खिल्ली उडवली आहे.हिंसा रोखणार्‍यांना त्याने धमकीही दिली आहे.