1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

इंग्लंडला वादळाचा तडाखा..

इंग्लंडला वादळाचा तडाखा..
इंग्लंड मधील अनेक भागांना आज (सोमवार) वादळाचा जोरदार तडाखा बसला. ताशी 80 किलोमीटर वेगाने वाहणार्‍या या वार्‍याने दक्षिण आणि पश्चिम भागाला चांगलेच झोडपून काढले आहे.

या वादळाने या भागातील जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून, अनेक ठिकाणी वीज आणि फोनच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

किनार्‍या लगतच्या डेवेन आणि कार्नवाल या भागाला पुराचा इशारा देण्यात आला असून या भागातील अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हालविण्यात आले आहे.
About Writer
भाषा