1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

इराणमध्ये बस अपघात, 23 ठार

पश्चिम इराणमधील हमेदान प्रांतात आज सकाळी झालेल्या एका बस दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला असून 34 जण जखमी झाले आहेत.

इराणची राजधानी तेहरानकडे जात असलेल्या एक प्रवाशी बस व समोरून येणार्‍या ट्रक यांच्यात समोरासमोर टक्कर झाल्यामुळे हा अपघात झाला.

दोन दिवसांपूर्वीच बंदार अब्बास आणि करमनशाह शहरात झालेल्या बस अपघातात काही जण ठार झाले होते. परंतु, मृतांचा आकडा समजू शकला नव्हता.