1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

ऑफीसेसला ई-मेलचा अभिशाप!

सिगारेट आणि चहाच्या फुरक्यानंतर आता ई-मेलचा ऑफीस कामकाजावर दुष्पपरिणाम होत असल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणात दिसून आली आहे.

'द टेलीग्राफ' या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालात कामकाजाचा बराचसा वेळ ई मेल पाठविण्यात जात असून एक कर्मचारी एका दिवसाला दहा मिनिटापासून ते दोन तासापर्यंत एसपीएएम आणि जंक मेल वाचण्यामध्ये वाया घालत असल्याचे सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे.

रेडीकटी समूहाने केलेल्या या सर्वेक्षणात जगात एका दिवसात 196 अरब संदेश ई मेलद्वारे पाठविले जात असून 2011 पर्यंत प्रति दिवसाला 374 पर्यंत हा आकडा पार करण्याची शक्यता आहे.