1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

ओपेकवर फिक्सिंगचा आरोप

गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होणार्‍या बेलगाम वाढीला ओपेकच जबाबदार असून, ओपेकने फिक्सिंग केल्याचा गंभीर आरोप करत संस्थेच्या विरोधात अमेरिकी संसदेत काल एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

डेमोक्रेटीक पक्षाचे प्राबल्य असलेल्या अमेरिकी संसदेत काल हा प्रस्ताव 324 मतांनी मंजूर करण्यात आला. सध्या तेलाच्या किंमती 129 डॉलरवर पोहचल्या आहेत, अशा वेळी अमेरिकी संसदेने ओपेक विरोधात बंड केल्यानं बाजारात आणखी अस्थिरता निर्माण झाली आहे.