चीनवर आता आभाळ कोसळले
विनाशकारी भूकंपातून चीन पुरते सावरले नसतानाच आता चीनमध्ये आलेल्या पुरात 50 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. चीनच्या शिंन्हूआ या सरकारी न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे.
यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने 50 जणांचा मृत्यू झाला आहे. गुईसेबू भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून आतापर्यंत 36 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. अनेक जण बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याच महिन्याच्या सुरुवातीला चीनमध्ये आलेल्या भूकंपात 88 हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे.