डायना बनविणार होती माहितीपट
ब्रिटनची दिवंगत राजकन्या डायनाला एका माहितीपटाची निर्मिती करायची होती. डायना ही लोकांमध्ये मिसळणारी राजकन्या होती. त्यामुळे लोकांप्रती तिला असलेला कळवळा या माहितीपटातून व्यक्त झाला असता. सारा ब्रॅडफोर्ड हिने डायनाच्या लवकरच प्रसिद्ध होत असलेल्या चरित्रात ही माहिती दिली आहे. ब्रॅ़डफोर्डनेच राणी एलिझाबेथचे चरित्र लिहिले होते.
डायनाने न्यूयॉर्कमध्ये पत्रकारितेचे प्रशिक्षण घेतले होते. आपल्या सामाजिक विचारधारेस माहितीपटाच्या माध्यमातून अभिव्यक्ती देण्याच्या विचारात ती होती, अशी माहितीही ब्रॅडफोर्डने चरित्रात दिली आहे.
डायना शालेय जीवनात हुशार विद्यार्थी नसली तरी तिच्या विषयांच्या निवडीवरून ती इतरांपेक्षा वेगळ्या व्यक्तिमत्वाची होती. डायनाच्या स्मरणार्थ एक जुलैला होणाऱ्या कार्यक्रमात ब्रॅडफोर्ड पुस्तकाबाबत सविस्तर माहिती देणार आहे.