तर जगावर मोठे संकट- झरदारी
तालिबानला अभय देणाऱ्या पाकिस्तानला आता आपली चूक कळली असून, पाकमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने मदत केली नाही तर सारे जग संकटात सापडेल असे सांगत पाकचे राष्ट्राध्यक्ष आसिफ झरदारी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदत याचना केली आहे.
तालिबान एखाद्या भयावह कर्करोगाप्रमाणे पसरत असून, यात तूर्तास पाक अडकला आहे. पाकला यातून सोडवण्यासाठी मदत न मिळाल्यास इतर देशांपर्यंत हा रोग पसरण्यास वेळ लागणार नसल्याचे ते म्हणाले.
स्वात खोऱ्यातून तालिबानी दहशतवाद्यांना मागे ढकलण्यात आले असून, या भागात स्थलांतरित केलेल्या नागरिकांनी परतण्यास सुरुवात केल्याचे झरदारी म्हणाले.